सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? कंगनाची शिवसेनेवर टीका

Kangana Ranaut-CM Uddhav Thackeray

मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी (Arnab goswami)यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन आता अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणानंतर कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, “मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, आज तुम्ही अर्णव गोस्वामी यांच्या घरी जाऊन त्यांना मारलंत, त्यांना त्रास दिलात, तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात, अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? तुम्ही अजून किती लोकांचा आवाज बंद कराल, सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे? परंतु हा आवाज वाढत जाणार आहे.

इतकेच नाही तर स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोक शहीद झाले आहेत. तुम्ही एक आवाज बंद कराल, तर अनेक आवाज उठतील. तुम्हाला कोणी पेंग्विन म्हटल्यावर राग का येतो? लोक तुम्हाला पप्पू सेना म्हणतात तेव्हा तुम्हाला राग येतो. तुम्ही पप्पूसारखं काम कराल तर तुम्हाला पप्पूसेनाच म्हणतील. सोनिया सेना म्हटल्यावर तुम्हाला राग येतो, परंतु तुम्ही सोनिया सेनेचे (Sonia Sena) लोक आहातच, अशा शब्दात कंगनाने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER