अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत; आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर निशाणा

Sanajy raut-Ashish Shelar

मुंबई : अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक झाल्यानंतर राज्यात नवा वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजपा अशी शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. याच प्रकरणावरून भाजपानं आता सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावरही टीका केली .

रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करून तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करून ‘दिशा सालीयन’बाबत बोलणाऱ्यांची तोंडं का बंद करताय? बात और भी निकलेगी… असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका ‘सिंह’ यांना ‘परमवीर’ का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका ‘युवराज’ला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडितहो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत.” असे ट्विट शेलार यांनी केले आहे .

:

ही बातमी पण वाचा : आणीबाणी २.० : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचं पोस्टर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER