जळगाव महापालिकेवर सेनेचा भगवा फडकणार? न्यायालयाचा भाजपला दणका

Jalgaon Mahanagar Palika Maharastra Today

मुंबई :- जळगाव महापालिकेची (Jalgaon Mahanagarpalika) महापौर आणि उपमहापौर निवडणूक (Mayor Election) येत्या १८ मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं २७ नगरसेवक फोडून सुरुंग लावला आहे. याच पार्श्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक टाळण्यासाठी भाजपने (BJP) औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High Court) धाव घेतली होती. पण, कोर्टाने भाजपची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक ही ऑनलाईन होणार आहे.

जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीने ५७ पैकी तब्बल ३० नगरसेवक सेनेत दाखल झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्यानं भाजपानं कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन घेतली तर व्हीप बजावता येईल, अशी भूमिका मांडली. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावली आहे. कोरोना परिस्थिमुळे निवडणूक ऑनलाईन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा : जळगावात महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कसली कंबर  ; भाजपला दगाफटक्याची भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER