सैनिकी रुग्णालयाच्या सोयीसुविधांवर शंका घेणे दुर्भाग्यपूर्ण; सेनेने व्यक्त केली खंत

Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लेह येथील जनरल हॉस्पिटलमध्ये भेट दिली.  त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या रुग्णालयाच्या सोयीसुविधेबाबत शंका उपस्थित करणारे विधान “दुर्भाग्यपूर्ण आणि दुःखद आरोप” असल्याचे भारतीय सैन्याने शनिवारी सांगितले.

याबाबत भारतीय सैन्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला लेहमधील रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरम्यान दिसत असलेल्या सोयीसुविधांबाबत काही ठिकाणी दुर्भाग्यपूर्ण आणि असमर्थनीय शंका घेणारे संदेश पसरताना आढळून आले आहेत.

आपल्या लष्करी दलातील शूर सैनिकांवर सुरू  असलेल्या उपचारांबाबत शंका घेणे दुर्दैवी आहे. लष्करी दले आपल्या जवानांना सर्वोत्तम उपचार देतात. या सोयीसुविधा आपत्कालीन विस्ताराचा भाग आहेत. १०० खाटा असलेला हा विस्तारित भाग या रुग्णालय परिसराचाच आहे.

कोविड-१९ दरम्यान पालन कराव्या लागणाऱ्या नियमांनुसार सार्वजनिक रुग्णालयाचे काही वॉर्ड्स विलगीकरण कक्षात रूपांतरित करणे आवश्यक होते. हे रुग्णालय कोविड-१९ विशेष रुग्णालय म्हणून राखल्यामुळे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे आणि दृक्-श्राव्य माध्यमाची सोय असलेले सभागृह वॉर्डमध्ये रूपांतरित करण्यात आले. जखमी शूर सैनिकांना गलवानमधून इथे आणण्यात आल्यानंतर त्यांना कोविड-१९ साठी राखीव भागापासून दूर ठेवणे आवश्यक होते. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे लष्कराच्या कमांडरांसह जखमी शूर सैनिकांना भेटण्यासाठी याच ठिकाणी आले होते. असे स्पष्टीकरण भारतीय सेनेने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER