शिवसेनेचे मिशन उत्तर महाराष्ट्र : संजय राऊत बुधवारपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

Sanjay Raut

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने पक्ष विस्तारावर भर देण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्राची सत्ता हातात घेतल्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त महापालिकेत शिवसेनेची सत्ता यावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासर्वाची जबाबदारी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवली असून, राऊत यांनी उत्तर महाराष्ट्रावर लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत हे ९ ते १३ जूनदरम्यान पाच दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर जाणार आहेत. या पाच दिवसात शिवसेना संघटन वाढीसाठी ते नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठका घेणार आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल.९ जूनला दुपारी मुंबई येथून ते नाशिककडे प्रयाण करतील. सायंकाळी नाशिक येथे ते गाडेकर, पांडे, कुटूंबियांची भेट घेणार आहेत. त्यांचा नाशिकमध्ये मुक्काम असेल. १० जून रोजी सकाळी नाशिक येथून खाजगी वाहनाने ते धुळ्याकडे प्रवास करतील. दुपारी २ वाजता धुळे जिल्हा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता धुळे येथून नंदुरबारकडे ते प्रयाण करतील. नंदुरबार येथे रात्री त्यांचा मुक्काम असेल.

११ जून रोजी सकाळी नंदुरबार जिल्हा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत ते बैठक घेणार आहेत. दुपारी नंदुरबार येथून चोपडा, जि. जळगाव कडे ते प्रयाण करतील. सायंकाळी चोपडा येथे रावेर लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बैठक घेणार आहेत. सायंकाळी चोपडा येथून जळगावकडे ते प्रयाण करतील. रात्री जळगावला त्यांचा मुक्काम असेल. १२ जून रोजी सकाळी जळगाव लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी ३ वाजता जळगाव येथून नाशिककडे ते प्रयाण करतील. रात्री नाशिक येथे त्यांचा मुक्काम असेल. १३ जून रोजी सकाळी दिंडोरी लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत बैठक होईल. त्यानंतर नाशिक लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत ते बैठक घेतील. दुपारी शासकीय विश्राम गृह येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारीते मुंबईकडे रवाना होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button