सचिनवरील नाराजीच्या झळा अर्जुनलाही पोहचताहेत

अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) आपल्या पित्याच्या हिमालयाएवढ्या कर्तृत्वाशी सतत तुलनेचा आणि सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) नावाच्या माणसाचा मुलगा असल्याचा त्रास होणार हे गृहितच आहे पण आता त्यात सचिनने केलेल्या #Indiatogether या हॕशटॕगखाली केलेल्या काॕमेंटची भर पडली आहे आणि त्यामुळे अर्जुन तेंडूलकरला गूणवत्तेपेक्षा घराणेशाहीमुळे फायदा होईल अशी टीका आता लोक करु लागले आहेत. निमित्त घडले आहे ते अर्जुन तेंडूलकरने आयपीएल 2021 (IPL 2021) साठी स्वतःला रजिस्टर केल्याचे.

आयपीएल 2021 साठी लिलावात आपण उपलब्ध असल्याचे जाहीर करत अर्जुन तेंडूलकरने स्वतःला रजिस्टर केले आहे. 18 फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावासाठी त्याने 20 लाख रुपये अशी आपली बेस प्राईस ठेवली आहे. त्यावरुन सचिनवर आधीच नाराज असलेल्या टीकाकारांना संधी मिळाली आहे आणि त्यांनी अर्जुन तेंडुलकरची योग्यता नसली तरी केवळ सचिन तेंडूलकरमुळे मुंबई इंडियन्स आपल्या संघात घेतील आणि प्रसंगी एक कोटीसुध्दा मोजतील अशी टीका केली आहे.

अर्जुनने आतापर्यंत फक्त दोनच टी-20 सामने खेळले आहेत. सैयद मुश्ताक अली ट्राॕफीच्या त्या सामन्यांमध्ये त्याने फक्त तीन धावा केल्या आहेत आणि दोन विकेट काढल्या आहेत. हे दोन्ही सामने मुंबईने गमावले. त्यात अर्जुनची कामगिरी अनूक्रमे शून्य धावा व 34 धावात एक बळी आणि तीन धावा व 33 धावात एक बळी अशी राहिली. या कामगिरीच्या आधारे त्याने आयपीएलसाठी रजिस्ट्रेशन करण्यावरच काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER