लग्नाच्या 21 वर्षानंतर घटस्फोट घेणारा अर्जुन रामपाल

Arjun Rampal

सतत वादात सापडत असलेल्या अभिनेता अर्जुन रामपालचा (Arjun Rampal) आज वाढदिवस आहे. मॉडेलिंग करीत झगमगत्या दुनियेत प्रवेश केलेल्या अर्जुन रामपालने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. देखणा असलेल्या अर्जुनने लवकरच बॉलिवूडमधील ए श्रेणीच्या कलाकारांमध्ये स्थान मिळवून सगळ्यांनाच चकित केले होते. खरे तर त्याला अभिनय येत नाही असे अनेक चित्रपट समीक्षकांचे म्हणणे होते, तरीही तो यशस्वी झाला हे महत्वाचे. नेहमी वाद निर्माण करणाऱ्या अर्जुुनचे नुकतेच बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणात नाव आले होते. या प्रकरणा त्याची चौकशीही झाली होती.

अर्जुन रामपालने ‘प्यार इश्क और मोहब्बत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अर्जुनने माजी मिस इंडिया आणि सुपर मॉडेल मेहर जेसियासोबत (Mehr Jesia) लग्न केले होते. मात्र लग्नाच्या 21 वर्षानंतर त्याने 30 एप्रिल 2019 ला मेहरपासून घटस्फोट घेतला आणि दोघे वेगळे झाले. या दोघांना माहिका आणि मायरा या दोन मुली असून त्या सध्या आईसोबत राहतात. सध्या अर्जुन साऊथ आफ्रिकेची मॉडेल अभिनेत्री गॅब्रिएलासोबत लिव्ह इनमध्ये राहात असून त्यांना गेल्या वर्षी एक मुलगाही झाला आहे. 2018 मध्ये एफएचएम ने जगातील सगळ्यात सेक्सी 100 महिलांच्या यादीत गॅब्रिएलाचा समावेश केला होता. बॉलिवूडमधील काही जोडप्यांचा संसार तोडण्यात अर्जुनचा हात असल्याचा आरोपही केला जातो.

काही दिवसांपूर्वीच एनसीबीने गॅब्रिएलाच्या भावाला ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्जुनच्या घरी छापाही मारण्यात आला होता. या दोघांची एनसीबीने चौकशीही केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER