‘मालिकेतील संभाजी महाराजांचे अटकेनंतरचे हाल दाखवू नये’, सेनानेते खोतकरांची मागणी

arjun-khotkar-on-chhatrapati-sambhaji-maharaj-serial-last-episode

जालना :- गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. औरंगजेबाच्या तावडीत संभाजी महाराजांचे हाल होताना दिसत आहे. मात्र संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाही. त्यामुळे मालिकेतील चित्रीकरण थांबवा, अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात विनंती करणार असल्याचंही खोतकरांनी सांगितलं.

‘संपूर्ण महाराष्ट्राला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांविषयी संपूर्ण माहिती मिळाली आहे. आता संभाजी महाराजांची अटक झालेली आहे. अटकेनंतर संभाजी महाराजांचे जे हालहाल केले, ते संपूर्ण जगाला माहीत आहेत. त्यामुळे ते चित्रीकरणाच्या माध्यमातून लोकांसमोर दाखवू नयेत.’ असं मत खोतकरांनी व्यक्त केलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे झालेले हाल टीव्हीवर दाखवण्यात आले तर प्रेक्षकांच्या भावना दुखावतील; अन्यथा उफाळून येतील, अशी भीतीही अर्जुन खोतकर यांनी यावेळी व्यक्त केली. ‘पुढचं प्रक्षेपण दाखवू नका, अशी विनंती मी ‘झी समूह’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहे’ असं खोतकर म्हणाले.

चिमुरडीचा ‘संभाजींना’ घरी येण्याचा आग्रह, कारण ऐकून खासदार कोल्हे भावूक