डेव्हिड धवनशी वाद असूनही वरुणने गोविंदाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Govinda & Varun Dhawan

अभिनेता गोविंदा (Govinda) आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan) यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. एकेकाळी दोघांनीही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र दिले; पण आता दोघेही एकमेकांशी बोलतही नाहीत. या सर्वांच्या दरम्यान वरुण धवनने (Varun Dhawan) अलीकडेच गोविंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यावर गोविंदाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरुण धवनने आपल्या इन्स्टा स्टोरीवर गोविंदा आणि वडील डेव्हिड धवन यांचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ओजी कुली नंबर १ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ गोविंदाने ही पोस्ट आपल्या इन्स्टावर शेअर केली आणि लिहिले, ‘थँक यू बेटा.’

काही काळापूर्वी गोविंदा इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’मध्ये डेव्हिड धवनबरोबरच्या आपल्या वादाबद्दल बोलला होता. गोविंदा म्हणाला होता, “राजकारण सोडल्यानंतर मला थोडे अस्वस्थ वाटू लागले.” त्यावेळी माझा सेक्रेटरी डेव्हिड धवनसह काम करत होता. एक दिवस सेक्रेटरी माझ्या बरोबर बसला होता. त्यानंतर डेव्हिड धवनचा फोन आला. मी त्याला स्पीकरवर फोन ठेवण्यास सांगितले. मी ऐकले की डेव्हिड धवन असे म्हणत होता की चिचि (गोविंदा) बरेच प्रश्न विचारू लागला आहे. असे बरेच प्रश्न जे की, मला त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही. हे ऐकून माझे हृदय तुटले आणि मी त्याच्याशी काही महिने बोललो नाही.” गोविंदा पुढे म्हणाला, “चार-पाच महिन्यांनंतर, मी त्याला पुन्हा एकदा विचारले की, तुझ्या एका चित्रपटात मला गेस्ट अपीयरेंसची भूमिका देईल का? पण त्याने मला परत कधीच कॉल केला नाही. मी बर्‍याच वर्षांनंतर ही गोष्ट सार्वजनिक करीत आहे. मला वाटत नाही की हा तो डेव्हिड धवन आहे ज्याला मी ओळखतो.” सांगण्यात येते की, गोविंदाचा सुपरहिट फिल्म ‘कुली नंबर-१’ चा रीमेक २५ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओ रिलीजसाठी तयार आहे. यात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. अलीकडेच या चित्रपटाची बरीच गाणी रिलीज झाली, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER