‘वरावरा राव यांच्या वयाचा विचार करून युक्तिवाद करा’

Mumbai High Court

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार खटल्यातील अटकेत असलेले आरोपी प्रा. वरावरा राव यांचे वय ८० वर्षांच्या पुढे आहे व त्यांची प्रकृती खूप नाजूक आहे याची जाणीव ठेवून दोनही बाजूंच्या वकिलांनी त्यांच्या जामिनाच्या अर्जावर युक्तिवाद करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयान केली.

न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार राव यांना तळोजा कारागृहातून नाणावटी इस्पितळात हलविण्यात आले आहे. त्यांनी वैद्यकीय कारणांंवरून जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे तर त्यांच्या पत्नीने राव यांच्या पत्नी पेंदलया हेमलता यांनी पतीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याबद्दल याचिका केली आहे.

न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या कंडपीठापुढे या दोन्ही याचिका सुनावणीस आल्या. राव यांच्या तब्येतीविषयीचा ताजा वैद्यकीय अहवाल नाणावटी इस्पितळाने बंद लिफाफ्यात पाठविला आहे, असे ‘एनआयए’तर्फे काम पाहणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. त्यावर तो अहवाल पाहून युक्तिवादावर विचार करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती राव यांचे वकील आर. सत्यनारायण यांनी केली. त्यानुसार पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी ठेवताना न्या. शिंदे यांनी दोन्ही वकिलांना वरीलप्रमाणे विनंती केली.

या प्रकरणातील आजारी आणि वृद्ध आरोपींच्या याचिकांवर विचार करताना न्या. शिंदे नेहमीच मानवतावादी दृष्टिकोन घेत आले आहेत. थिर गोष्टींहून माणुसकी जास्त महत्वाची आहे, हे त्यांनी यापूर्वीही बोलून दाखविले आहे. राव यांची प्रकृती खूपच खराब आहे हे लक्षात घेऊन, अभियोग पक्षाचा विरोध असूनही त्यांना तुरुंगातून तात्काळ नाणावटी इस्पितळात हलविण्याचा आदेशही त्यांनी याच भूमिकेतून दिला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER