केस गळतीमुळे त्रस्त आहात ? मग जाणून घ्या हे उपाय

Fiveinone

पावसाळा संपता संपता हवेत गारवा येत हिवाळ्याची चाहूल लागते. या ऋतूत आपली त्वचा कोरडी होऊ लागण्यामुळे डोक्याच्या कवटीवरील कोंड्याचे प्रमाणही वाढू लागते. त्यामुळे केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुरु होते. काही घरगुती आणि काही आयुर्वेदिक उपचार केल्याने तुमची केस गळतीच्या या समस्येपासून सुटका होऊ शकते. जाणून घ्या काही उपाय..

१. आवळा:
आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सीडंट असतात. यामुळे केस गळती थांबण्यास तसेच केस वाढण्यास मदत होते. आवळा, ब्राम्ही पावडर आणि दही एकत्र करून ते मिश्रण केसावर लावल्याने केस गळती थांबण्यास मदत होते.

२. भृंगराज:
घनदाट आणि मजबूत केसांसाठी आयुर्वेदामध्ये भृंगराजला महत्त्वाचे मानले गेले आहे. भृंगराजचे तेल केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे केस मजबूत, लांब आणि घनदाट होतात. तसेच केस पांढरे होण्यापासून वाचविण्याचे काम देखील भृंगराज करते.

३. कडूलिंब:
कडूलिंबाच्या पानांच्या वापराने केस घनदाट होतात. तसेच केसांमधील कोंडा देखील नाहीसा होतो. कडूलिंबाच्या पानांचे पावडर तयार करून त्याला दही किंवा खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावा. यामुळे तुमचे केस लांब आणि घनदाट होतील.

४. रीठा:
रीठा वापरल्याने केस काळे आणि घनदाट राहण्यास मदत होते. रीठा पावडर तेलात मिक्स करुन नियमित या तेलाने मालिश केल्यास केसगळती थांबते.

५. ब्राम्ही:
ब्राम्ही केस गळती थांबविण्यासाठी अतिशय उपायकारक ठरते. ब्राम्ही आणि दही एकत्र करून केसांना लावल्यास केस गळणे थांबते. ब्राम्हीच्या तेलाने नियमित मसाज केल्याने केस घनदाट होतात.