घरातच बसून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांबाबत समाधानी आहात का? मनसेच्या ऑनलाईन सर्वेला सुरुवात

Raj Thackeray - CM Uddhav Thackeray

मुंबई :- सध्या कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. अनेकांचे रोजगार हिरावले गेले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल करून मॉल्स, बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी काही जिमचालकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत आपली व्यथा मांडली.

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी जिमचालकांना जिम चालू करा, पुढचे मी बघतो, असा विश्वास दिला होता. तुम्ही केंद्र सरकारने जारी केलेल्या दिशानिर्देशाचे पालन करून जिम सुरू करा, असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच लॉकडाऊन वाढवणे योग्य होणार नाही, असे मतही व्यक्त केले होते. दरम्यान, आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) धोरणावरून मनसेने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे.

आता मनसेने (MNS) थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षणही मनसेने सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी व उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का? या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का? लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का? लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का? लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का? असे एकूण आठ प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Survey Link : Click Here

ही बातमी पण वाचा : मनसेच्या आंदोलनानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक; वीजबिलाबाबत उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER