शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का? प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसवा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सामना’तून करण्यात आलेल्या टीकेवरुन शिवसेनेवर (Shivsena) पलटवार केला आहे . छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितले जाते. मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? ते माझा खून करणार आहेत का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही. मला सामनाला एवढंच विचारायचं आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले

तसेच आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्यात अराजकीय मुद्द्यांवरुन राजकारण सुरु असले तर त्यावरुन फारसा परिणाम होत नाही. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आपातकालीन व्यवस्थापन कायद्यातंर्गत आदेश काढत आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. आंबेडकरांच्या विधानानंतर चांगलेच वादंग पेटले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER