डिप्रेशनमध्ये आहात ? कशाला टेंशन घेताय, प्रत्येकाला असं कधी न कधी वाटतंच ! फक्त 2 मिनिटं काढा आणि वाचा.

Are you depressed Why the tension, everyone thinks so sometimes! Just take 2 minutes and read

त्याचं होतं काय भावांनो आपण लय जास्त विचार करून टाकतो. असं करू का तसं करून बघू आणि याच्यात जर फसलो तर डोक्याला खतरनाक ताण होऊन जातो. कधी कधी काही गोष्टी मनासारख्या नाही होत. तेव्हा पण आपल्याला डिप्रेशन (Depression) येतं. एवढ्या सगळ्यात काही चुकीच्या गोष्टी करण्याचे विचारपण यायला लागतात पण आपण तसं काय करायचं नाही, लय सोप्पं असतं भावा, एकदा वाचा अन विचार करा.

आता डोकं एकदम खतरनाक टेंशन मध्ये असलं की चार शहाणे जसे आपल्याला लय सल्ले देतात पण आपल्याला काय ते ऐकायचे नसतात.. तसंच काहीतरी आपल्याला हे सांगणार. पण आपल्याकडे साधे-सोप्पे अन हलके फुलके उपाय आहेत. अशावेळी काय करायचं तर सरळ डिप्रेशनला फाट्यावर मारत कानात हेडफोन टाकायचे आणि आवडतं गाणं ऐकत बसायचं.

गाणी ऐकण्यानं खतरनाक रिलॅक्सेशन मिळतं. पिक्चर बघनं, पुस्तकं वाचणं हा अजुन एक पर्याय आहे. पुस्तकं वाचून आणि पिक्चर बघून प्रॉब्लेम सुटत नाही, पण बर्‍याचवेळा पिक्चर आणि पुस्तकातून प्रॉब्लेम सोडवण्याचे उपाय सापडून जातात.

अजून एक पर्याय आहे. मित्रांमध्ये जा, तुमचे प्रॉब्लेम ज्याला कुणाला सांगता येतील त्या माणसाला सांगून टाका. मोकळे व्हा. याने होतं काय माहितीये का.. समोरच्या माणसाचा तुमच्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो. बर्‍याच वेळा तो सोप्पं काहीतरी सोलूशन देऊन टाकतो आणि आपण त्यातून बाहेर पडतो.

आपल्याला काय येत नाही हे एकदा तपासून बघा आणि शिकून घ्या ना ते.. जर त्यामुळे तुमचं अडलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम सुटतो नं डायरेक्ट तिथंच.

एवढ्या सगळ्यात फक्त एक गोष्ट टाळा. डिप्रेशन जाणवत असताना दारू सारखी व्यसनं जेवढी टाळता येतील तेवढ चांगलं. कारण दारू पिऊन काही सुचत तर नाहीच पण तुमचे पैसे खर्च होतं राहतात ते वेगळच. त्यामुळे व्यसनं जेवढी टाळता येतील तेवढं भारी.

डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी अजून एक चांगला उपाय म्हणजे योगा आणि व्यायाम. व्यायामाने तुमचं शरीर मजबूत आणि फ्रेश राहतं. याच्यामुळे तुमच्या विचारांना खूप फायदा होतो. निगेटिव्ह विचार जाऊन तुम्ही पॉसिटीव्ह विचार करायला लागता. त्यामुळे व्यायाम आणि योगा खूप फायदेशीर ठरतो.

एवढ्या सगळ्यामध्ये तुम्ही एकटे नाही हे नेहमी लक्षात ठेवा. मित्र, कुटुंबिय सगळे आपल्या सोबत असतात तुम्ही फक्त एकदा मनमोकळं बोलून तर बघा, बघा कसे प्रॉब्लेम सुटतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER