‘भाजपा नेत्याविरुद्ध बेशरम वक्तव्ये करणारी ती मोकाट गुरं सरकारची जावई आहेत का?’

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपाहार्य पोस्ट टाकल्यापरकरणी पुण्यातील तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, आकाश शिंदे यांनी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याच मुद्द्यावरून भाजपने (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला (MVA)लक्ष्य केले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तिसरी लाट कोरोनाची नसेल तर मराठ्यांची असेल’, नितेश राणेंचा ‘ठाकरे’ सरकारला इशारा

राज्यात फक्त ठाकरे सरकारशी संबंधित नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे गुन्हा आहे का? बाकी ४० पैसेवाल्या खुली सूट दिली आहे. भाजपा नेत्याविरुद्ध बेशरम वक्तव्ये करणारी ती मोकाट गुरं जावई सरकारची आहेत का? असा प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उपस्थित केला आहे. आता भातखळकर यांनी केलेल्या या विधानाचे महाविकास आघाडी सरकारकडून कश्याप्रकारे प्रत्युत्तर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button