शेतकरी सरकारचे वैरी आहेत काय? : हसन मुश्रीफ यांचा सवाल

Hassan Mushrif

कोल्हापूर :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतीच्या पॅकेजमध्ये ऊसकरी व बागायती शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. शेतकरी केंद्र सरकारचे वैरी आहेत काय? असा सवाल मग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी उपस्थित केला. साखरेचा दर क्विंटलला ३१०० रुपयावरून ३५०० रुपये करा. एनपीएत गेलेल्या आर्थिक अडचणीतील साखर कारखान्यांना कर्जाचे सरळ सात हप्ते द्या. बफर स्टॉकचे व्याज, साखर निर्यातीचे अनुदान आणि कोजन प्रकल्पांचे अनुदान वेळेवर द्या, अशी मागणी यावेळी मुश्रीफ यांनी केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, उसकरी शेतकऱ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधा एका शब्दानेही उच्चार करत नाहीत. एवढा दुजाभाव कशासाठी ? केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील दिग्गज मंत्री नितिन गडकरी या प्रश्नाबद्दल बोलत नाहीत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्जाच्या पॅकेजमुळे उसकरी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कर्जफेडीची मुदत ही ३० जून असून आता ३१ मार्च ही कर्ज परतफेडीची तारीख धरून त्याला मुदतवाढ दिल्याने त्याचा ऊसकरी व बागायती शेतकऱ्यांच्या लाभ होणार नाही.

केडीसीसी बँक दरवर्षी ३२ कोटी रुपयांचा तोटा सहन करुन १८०० कोटी रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करते . सवलतीच्या पॅकेजमध्ये तीन टक्के आणि चार टक्के व्याजदर प्रामाणिकपणे भरणाऱ्या शेतकऱ्याला दिले जाणार. ही सवलत नवीन नाही, ती आधीपासून सुरूच आहे. कोरोनाच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक आहे. यापूर्वीच सवलत दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या फसव्या योजनेचा जिल्ह्याला काही उपयोग नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER