अर्धापूर : आर्थिक गैरव्यवहार भोवला; दाभडचे ग्रामसेवक एनलोड निलंबित…!

suspended

अर्धापूर : तालुक्यातील दाभडचे ग्रामसेवक जी. व्ही. एनलोड ग्रामसेवक 14 व्या वित्तआयोग अंतर्गत कामात अनियमिता व नियमानुसार आर्थिक व्यवहार केल्या नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कु.मिना रावताळे यांनी सदरील ग्रामसेवक एनलोड यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे.

नांदेड: स्थायी समितीच्या बैठकीत नुतन जि.प.अध्यक्षा सौ.अंबुलगेकर यांनी धरले अधिका-यांना धारेवर

आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ग्रामसेवक जी.व्ही.एनलोड यांनी मालेगाव व दाभड येथील कामात अनियमितता व गैरव्यवहार केल्याचे पंचायत समितीकडून केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. यात नमुना नंबर 5 ला नांव एकाचे व चेक दुसर्‍याच्या नांवे देवून अनियमितता केलेली आहे, चौकशीच्या वेळी अभिलेखे उपलब्ध न करुन देणे, जुनी ग्रामपंचायत इमारतीचा भाडेतत्वावर नियमबाहय देणे , डिपाजिट रक्कम खर्च करणे, जीएसटी व रॉयल्टी रक्कम उचल करुन शासन खाती रक्कम न भरणे, 14 व्या वित्त आयोगाची कामाची माहिती दरमहा एसटीएमएआयसी प्रणाली मध्ये न ठेवणे, ग्राम पंचायतीचे लेखे प्रिया सॉफ्ट या संगणकीय अज्ञावलीत न ठेवणे, ग्राम पंचायत दाभड व बेलसर येथील मासिक अहवाल न सादर करणे, सज्जावर सतत अनुपस्थित राहणे, वरिष्टांच्या आदेशाचे पालन न करणे, ग्राम पंचायत पेपरलेस न करणे, नमुना नंबर 8 व 9 अदयावत न करणे, व त्याच्या नोंदी ऑनलाइन न करणे, 1 ते 33 नमुने अदयावत न करणे . वरिल प्रमाणे अनियमितता केलेली असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. हि अत्यंत गंभीर स्वरुपाची बाबअसल्याची व सचोटीला धरून नाही असा आक्षेप घेण्यात आला आहे.

कार्यालयात कर्तव्य परायणता दिसून येत नसल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. ग्राम पंचायतीचे अभिलेखे अदयावत न ठेवणे व नियमा नुसार आर्थिक व्यवहार न करणे. या करणावरुन ग्रामसेवक जी. व्ही. एनलोड यांना दि.5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान निलंबन काळात ग्रामसेवक एनलोड यांचे मुख्यालय पंचायत समिती नांदेड येथे राहील असेही आदेशित करण्यात आले आहे.