अर्धापूर : कार चालकाचा ताबा सुटल्याने विजयवाडाचे एकाच कुटुंबातील आठ जण गंभीर जखमी…!

accident

अर्धापूर : समोरुन भरवेगात येत असलेल्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्ड्यात कोसळल्याची घटना नांदेड ते भोकर मार्गावर आमराबाद पाटीजवळ 30 जानेवारी रोजी घडली. या अपघातात कारमधील एकाच कुटूंबातील 8 जण गंभीर जखमी झाले.

मोसंबीला एका टनाला एक क्विंटल कट्टी व 3 टक्के आडत

विजयवाडा नंदीग्राम येथील मुळचे रहिवाशी असलेले आम्लपुरपू कुटूंब कार क्र. के.एल.34 डी. 3582 मधून 30 जानेवारी रोजी भोकरहून भोकरफाटाकडे जात होते. समोरून येणार्‍या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात चालकाचा कार वरील ताबा सुटला, कार खड्डयात कोसळली. यात आठ जण गंभीर जखमी झाले.

जखमीमध्ये सत्यवती सिहेच (60), प्रिती कृष्णकुमार आम्लपुरपू, (12), दिपीका आम्लपुरपू (35), वीरभद्र आम्लपुरपू (83), महेश लक्ष्मी (12), कार्तिकेय आम्लपुरपू(13), कृष्णकुमार वीरभद्र आम्लपुरपू(40) व नरेश मारांम (29) सर्व रा. विजयवाडा,नंदीग्राम, (आंध्रप्रदेश) या आठ जणांचा समावेश आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे पोलिस कर्मचारी रामोड व वसंत शिनगारे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेद्वारे धाव घेवून जखमींना विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.