अरबाज खान काम करणार विवेक ओबेरॉयच्या चित्रपटात

Vivek Oberoi - Arbaaz Khan

सलमान खानबरोबरचे (Salman Khan) नाते तोडल्यानंतर ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoi) डेटिंग करू लागली होती. त्यामुळेच सलमान खानने विवेक ओबेरॉयला मारण्याची जाहीर धमकी दिली होती आणि विवेक ओबेरॉयनेही पत्रकार परिषद घेत सलमान खानला प्रति आव्हान दिले होते. त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली. खरे तर विवेक ओबेरॉयने एका कार्यक्रमात जाहीरपणे सलमानकडे दिलगिरीही व्यक्त केली होती पण सलमानने त्याला माफ केले नव्हते. अजूनही या दोघांमध्ये कटुता कायम आहे. असे असतानाही सलमान खानचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) विवेक ओबेरॉयच्या चित्रपटात काम करण्यास होकार दिल्याने बॉलिवुडमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विवेक ओबेरॉय ‘रोजी- द सॅफरन चॅप्टर’ नावाचा एक हॉरर चित्रपट तयार करीत असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होतीच. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिका साकारीत असून याची निर्मितीही तोच करीत आहे. 2003 मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मध्यवर्ती भूमिका साकारीत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल रंजन मिश्रा करीत आहे. कॉफी विथ डी, मरुधर एक्सप्रेस, हॉटेल मिलन इत्यादी चित्रपटांचे विशालने दिग्दर्शन केलेले आहे. याच चित्रपटात एक अत्यंत महत्वाची भूमिका साकारण्यासाठी विवेक ओबेरॉयने अरबाज खानला विचारले. भूमिका ऐकून अरबाज लगेचच काम करण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सलमान खान यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER