आराध्याचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार

Bachaan Family

बॉलिवूडमधील (Bollywood) हिट कपल अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Bachchan) आहे. सध्या ज्याप्रमाणे सैफ आणि करिनाच्या तैमूरकडे सगळ्यांचे लक्ष असते तसेच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मुलीकडे म्हणजे आराध्याकडेही असते. अभिषेक, आराध्या आणि ऐश्वर्याचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर धडपडत असतात. त्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरी पार्टी असली की फोटोग्राफर खुश असतात कारण त्यांना खूप फोटो काढण्याची संधी मिळते. आराध्याच्या वाढदिवसाला नेहमी मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाते आणि त्यावेळी बॉलिवूडमधील मोठे कलाकार त्यांच्या मुलांसह येतात. मात्र यंदा आराध्याचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बच्चन कुुटुंबियाने घेतला आहे.

गेल्या वर्षी आराध्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला शाहरुख खान, करण जोहरपासूनसगळे मोठे कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते. आज म्हणजे 16 नोव्हेंबरला आराध्याचा नववा वाढदिवस आहे. खरे तर हा वाढदिवस भव्य प्रमाणावर साजरा करण्याचा विचार बच्चन कुटुंबियांनी केला होता. परंतु कोरोनामुळे आराध्याचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुळे यंदाची दिवाळी पार्टीही रद्द केली होती. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त केक आणला जाणार असून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तो कापला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER