
मुंबई : दक्षिण अरब महासागरात येणार असलेल्या चक्रीवादळांमुळे यावर्षीही मान्सून मुंबईत उशिरा म्हजे ११ जूनला पोहचेल, असा अंदाज इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने व्यक्त केला आहे.
सध्या दक्षिण-पश्चिम अरब सागरात आलेल्या चक्रीवादळाचा फारसा परिणाम भारतात जाणवणार नाही. मात्र ३० मेच्या दरम्यान दक्षिण अरब सागरात दुसरे चक्रीवादळ येणार आहे व त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये पाऊस पडेल. मात्र यामुळे मान्सूनच्या हवांवर परिणाम होऊन मान्सून मुंबईत उशिरा म्हणजे ११ जूनपर्यंत पोहचेल. गेल्यावर्षीही मान्सून मुंबईत उशिरा २५ जूनला पोहचला होता.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की भारतात शेती मान्सूनवर अवलंबून असल्याने मान्सून वेळेवर आला नाही तर त्याचा शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला