नंदीग्राम जनतेचा जो निर्णय असेल तो मंजूर; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेची लढाई मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात भाजपचे (BJP) उमेदवार शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांची होती. मात्र, भाजपने नंदीग्रामध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचा दावा केला. त्यानंतर नंदीग्राममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नंदीग्राम मतदारसंघात शुभेंदू  अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १ हजार ९५७ मतांनी पराभूत केले, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. या पत्रकार परिषदेत ‘नंदीग्रामच्या जनतेचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे’ अशी प्रतिक्रिया ममतादीदींनी नंदीग्रामच्या निकालाच्या गोंधळावर दिली. पश्चिम बंगालचा अंतिम निकाल अद्याप हाती आलेला नाही. “आम्ही २२१ जागांवर विजय मिळवला आहे. भाजप पराभूत झाली आहे. केंद्राच्या सर्वतोपरी प्रयत्नानंतरही तृणमूलने ‘लँडस्लाईड’ विजय मिळवला आहे. मी म्हटले होते की, आम्ही डबल सेन्चुरी ठोकू.

या विजयाने पश्चिम बंगालच्या जनतेला वाचवले आहे. ‘खेला  होबे’ झाला आणि शेवटी आमचाच विजय झाला.” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक इतकी चुरशीची ठरली की, १५ व्या मतमोजणीच्या शेवटी ममता बॅनर्जी शुभेंदू अधिकारी यांच्या पुढे २ हजार ७०० मतांनी पुढे होत्या. मात्र,  १६ व्या फेरीअखेर  ममता बॅनर्जी आणि शुभेंदू  अधिकारी यांच्यात केवळ ६ मतांचा फरक होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button