गांजा वापराला मान्यता द्या; तस्लिमा नसरीन यांची सूचना

marijuana use; Suggestion from Taslima Nasreen

सुशांत सिंह राजपूत (SSR) मृत्युप्रकरणानंतर बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात विख्यात लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सूचना केली आहे, अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाच्या वापराला मान्यता द्या. याबाबत तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. हे ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे – अमेरिकेत काही राज्यांमध्ये पूर्णपणे तर काही ठिकाणी अंशत: गांजाला कायदेशीर मान्यता देण्यात आली.

युरोपमध्येही वैद्यकीय कारणांसाठी गांजाचा वापर करण्याची परवानगी आहे. गांजाला कायदेशीर परवानगी मिळायला हवी…ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ज्याला गरज आहे त्याला गांजाचा वापर करण्याची परवानगी असावी. मी स्वत: ‘स्मोक’ करत नाही…मला याची गरज नाही…. पण मी इतरांचा विचार करते. उल्लेखनीय आहे की, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची ‘ड्रग्ज’ प्रकरणी चौकशी होते आहे. सध्या देशभरात हा विषय चर्चेत आहे.

दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेकांची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, तस्लिमा नसरीन यांच्या गांजाला कायदेशीर करण्याच्या मागणीमुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. तस्लिमा नसरीन या बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, ‘फेरा’, ‘बेशरम’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. त्यांनी मुस्लिम  समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे ओढल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आले. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला. भारताविषयी त्यांच्या मनात आदर आणि प्रेम आहे. भारताने त्यांना आश्रय दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER