दोन लसींना मान्यता : शेअर बाजारात तेजी

Stock market

मुंबई: केंद्र सरकारने कोरोनावरील दोन भारतीय लसींना मान्यता दिल्याचा बाजारांवर खूपच सकारात्मक परिणाम झाला आहे. परिणामी नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहाच्या प्रारंभी भारतीय शेअर बाजारांवर तेजीचे वातावरण राहिले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन ऐतिहासिक उच्चांकी नोंदवली.

मुंबई शेअर बाजाराचा ३० प्रमुख कंपन्यांवर आधारलेला मुंबई शेअर निर्देशांक या सत्रात ४८ हजार १०९.१७ अंक पातळीवर खुला झाला. त्याने या सत्रात ४८ हजार २२०.४७ अंकांची उच्चांकी पातळी नोंदवली, तर त्यानेच ४७ हजार ५९४.४७ अंकांची नीचांकी या सत्रात नोंदवली. काल, दिवसअखेरीस निर्देशांक ३०७.८२ अंकांनी वर जाऊन ४८ हजार १७६.८० अंक पातळीवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० कंपन्यांवर आधारलेला निफ्टीही १४ हजार १०४.३५ अंक पातळीवर खुला झाला. त्याने १४ हजार १४७.९५ अंकांची उच्चांकी, तर १३ हजार ९५३.७५ अंकांची नीचांकी पातळी नोंदवली. दिवसअखेरीस त्यात ११४.४० अंकांची वाढ होऊन तो १४ हजार १३२.९० अंक पातळीवर बंद झालेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER