कोस्टल रोडसह अन्य कामात अडथळा ठरणारी ८०० झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

Tree Authority to cut down 800 trees for Coastal Road.jpg

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सुमारे ३,५३७ झाडे तोडण्याचे तर त्यापैकी १९०० झाडे पुनररोपीत करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी कोस्टल रोडसह महालक्ष्मी स्पोर्टस क्लब येथील तरण तलावाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत २२ पैकी १६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ८०० झाडे कापण्यास मंजुरी मिळाल्याचे वृक्ष प्राधिकरणातील अधिकाऱ्याने सांगितले.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या (Tree Authority Committee) बैठकीत सुमारे ३,५३७ झाडे तोडण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.त्यात सत्ताधारी शिवसेना व मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरणारी ३७३, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड येथील तरण तलावात अडथळा ठरणारी १६, भांडुप येथील रेल्वेवरील नाला रुंदीकरणात अडथळा ठरणारी ११५, वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्बांधकामात अडथळा ठरणारी ६२५ झाडे कापण्याचे तर ३५३७ पैकी १९०० झाडे पुनररोपीत करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरवारी एकूण २१५, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड येथील तरण तलावात अडथळा ठरणारी १६, भांडुप येथील नाले रुंदीकरणात ११५, वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात अडथळा ठरणारी ६२५ यांसह विविध कामांत अडथळा ठरणाऱ्या झाडे कापण्याचे प्रस्ताव नाॅट टेकन करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १५८ झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. १९०० झाडे पुनररोपित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER