‘शिवसंस्कार सृष्टी’साठी जागा देण्यास तत्वतः मंजुरी; अमोल कोल्हेंची माहिती

Amol Kolhe

जुन्नर : तालुक्यातील ‘शिवसंस्कार सृष्टी’साठी जलसंपदा विभागाची जागा देण्यास जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच रीतसर प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. यामुळे खासदार अमोल कोल्हे यांची ‘शिवसंस्कार सृष्टी’ साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचे संकेत आहेत.

छत्रपती महाराजांचे जन्मस्थानी शिवनेरी गडाच्या परिसरात ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभी राहावी, यासाठी खासदार कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी सतत पाठपुरावा केला. जागा उपलब्ध झाल्यास निधी देण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली होती. या अनुषंगाने कोल्हेंनी जलसंपदा विभागाच्या मालकीची जागा सुचवली होती. याबाबत जयंत पाटील यांच्या समवेत बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु कोरोना (Corona) संकटामुळे बैठक लांबणीवर पडत होती.

या संदर्भात कोल्हे (Amol Kolhe) यांनी पाटलांनी पत्र पाठवून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ३ जूनला मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत ‘शिवसंस्कार सृष्टी’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाच्या सादरीकरण पाहून प्रभावित झालेल्या पाटील यांनी कोल्हेंच्या संकल्पनेचे कौतुक केले आणि ‘शिवसंस्कार सृष्टी’साठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या निर्देशही दिले.

कोल्हे म्हणाले की, “जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर झाला आहे. मात्र, पर्यटन वाढीच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. या प्रकल्पामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यातून रोजगार निर्माण होईल. बेनके यांच्या सहकार्याने आम्ही हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button