परमवीर सिंगांच्या आदेशानेच वाझेंची नियुक्ती, मुंबई पोलिसांच्या हवालात खुलासा

Param Bir Singh - Sachin Waze - Maharastra Today

मुंबई : बहुचर्चित मनसुख हिरेज हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंबाबत धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांना पुन्हा शेवट घेण्यासाठी परमवीर सिंग यांच्या उपस्थित बैठक झाली होती.

तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा धक्कादाक खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे. निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्याचे संकेत आहेत. मात्र सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध झाला होता. सचिन वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्याालही विरोध झाला होता. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे.

काय म्हटलंय या अहवालात ?

मुद्दा १) सचिन वाजे यांना निलंबन आतून पुन: स्थापित कसं केलं आणि पुन:स्तथापित करण्याचा निर्णय घेतला?

माहिती – सचिन वाजे यांना सेवेत पुन:स्थापित करण्याचा निर्णय निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला . हा निर्णय तात्कालिन पोलिस आयुक्त, तात्कालिक पोलिस सह आयुक्त (प्रशासन), तात्कालिक अपर आयुक्त, आणि तात्कालिक पोलिस उप आयुक्त यांच्या बैठकीत घेण्यात

मुद्दा २) कार्यकारी पदावर पुनर्स्थापना का व कोणाकडून देण्यात आली?

माहिती – दि. ८/६/२० रोजी पोलीस अस्थापना मंडळाच्या बैठकीत वाजे यांची नियुक्ती करण्यात आली.

मुद्दा 3) सचिन वाजे हाताळत असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात कोणते वरिष्ठ अधिकारी पुनर्विलोकन करुन निर्देश देत होते ?

माहिती- सचिन वाजे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग करत नव्हते तात्कालीन पोलीस आयुक्त यांना परस्पर रिपोर्ट करत असल्याने तात्कालीन पोलीस आयुक्त यांच्या व्यतिरिक्त गुन्हे शाखेत या कोणत्याही अधिकाऱ्यानी वाजेना निर्देश दिलेले नव्हते.

मुद्दा 3) सचिन वाजे कार्यालयात येण्यासाठी कोणते वाहन वापरत होते?

माहिती – सचिन वाजे कार्यालयात येण्यासाठी मर्सडीज बेंज ऑडी इत्यादी खाजगी वाहनांचा वापर कार्यालयात येण्यासाठी करत होते.

मुद्दा 4) सी आय यु प्रमुखाचे सर्वसाधारणपणे कोणत्या दर्जाचे असते

माहिती – सी आय यु कक्षाचे प्रभारी पद हे सर्व साधारण पणे पोलीस निरीक्षक दर्जाचं असतं

मुद्दा 5) सचिन वाजे कोणाला रिपोर्टिंग करत होते आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तपास सुरू होता

माहिती – सचिन वाजे हे तत्कालीन पोलीस आयुक्त यांनाच रिपोर्टिंग करत होते तसंच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तपास करत होते. सचिन गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करत नव्हते त्याचप्रमाणे सचिन यांनी मधील त्यांचे सहकारी यांना सुद्धा गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करण्यास सक्त मनाई केली.

या रिपोर्टमध्ये असे देखील नमूद करण्यात आले की महत्त्वाच्या ब्रिफींग दरम्यान तात्कालीन पोलीस आयुक्तांसोबत वेळोवेळी हजर असायचे. तसेच एखाद्या गुन्ह्यासंदर्भात निर्णायक आणि तपासाला दिशा देणाऱ्या मुद्द्यावर झालेला निर्णय सचिन वाजे हे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायचे. या संपूर्ण रिपोर्ट वरून असे दिसून येते की सचिन वाजे यांचा एक वेगळाच दबदबा पोलिस दलात होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button