सुधीर मुनगंटीवारांची विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी निुयक्ती

Sudhir Mungantiwar

मुंबई :- महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

लोकलेखा समिती ही महाराष्‍ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्‍त समिती आहे. यामध्ये राज्‍याचे विनियोजन लेखे आणि नियंत्रक तसंच महालेखापरीक्षक यांचा अहवाल, त्याचं परिनिरीक्षण करणं, राज्‍य शासनाच्‍या वित्‍तीय लेख्‍यांचं आणि त्यावरील लेखापरीक्षा अहवालाचं परिनिरीक्षण करणं अशी कामं येतात.

दरम्यान मुनगंटीवार यांच्‍या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्‍या सदस्‍यपदी माजी मुख्‍यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar), माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री विनय कोरे, माजी राज्‍यमंत्री संजय सावकारे आदींचा समावेश असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER