नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी परभणीचे तरूण जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांची नियुक्ती

सामान्य प्रशासन विभागाचे आदेश

नांदेंड :- नांदेडचे कार्यकुशल व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अरूण .के.डोंगरे यांची शासनाधिन बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी परभणीचे जिल्हाधिकारी पी.शिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आज दि.13 रोजी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी जारी केलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश आज पारित झाला आहे.

धर्माबाद: तहसीलदांराच्या आडमूठीधोरणामुळे मालमत्ता धारकांची होतेय आर्थिक लुट,

परभणी जिल्हयाचे तरूण जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांची नांदेडच्या जिल्हयाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर परभणी येथे शिर्डी येथिल साई बाबा मंदीर विश्वस्थ व्यवस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम.मुंगळीकर हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुंगळीकर यांच्या मार्फत पाथरी व शिर्डी हा साईबाबांच्या जन्मस्थळावरील वादाचा तिढा सुटण्यास मदत होते का या कडे परभणीकरांचे लक्ष असणार आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी नांदेड जिल्यात अविस्मरणिय असे कार्य केलेले आहे. समयसुचकतेनुसार आपल्या कार्याची क्षमता दाखवून मोठ मोठया प्रशासकीय अडचणींना तोंड देत व त्यावर मात करत प्रयोगशिल माध्यमातून नांदेड जिल्हयाच्या विकासासाठी आपले प्रशासकीय कौशल्य पणाला लावले. त्यामुळे त्यांच्या कार्यरूपाने नांदेडकरांच्या अंत:करणात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे भिनलेले आहेत. सामाण्यातील एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून डोंगरे यांची कारकिर्द नागरीकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. विशेषत: अरूण डोंगरे सारखे प्रशासकीय अधिकारी नांदेडला लाभले हे नांदेडकरांचे भाग्य समजले जाते.