नियुक्त आमदारांची यादी; राज्यपालांनी अजून नाही दिली मंजुरी

Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांकडे १५ दिवसांच्या मुदतीची शिफारस करण्यात आली आहे. राज्यपालांकडे नावं देतानाच ठाकरे सरकारकडून मुदतीची शिफारस मागण्यात आली आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडून मंजुरीबाबत काहीही हालचाल नाही. (Thackeray Government Appeal To Governor Bhagatsingh Koshyari Declare 12 Governor Appointed MLA)

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून ६ नोव्हेंबरला राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देण्यात आली होती. १५ दिवसात राज्यपालांनी दिलेल्या यादीतील नाव जाहीर करावीत, अशी शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुदतीची शिफारस करून राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली होती.

यादीतील नाव

  • काँग्रेस
    १) सचिन सावंत (सहकार आणि समाजसेवा) २) रजनी पाटील (सहकार आणि समाजसेवा) ३) मुजफ्फर हुसैन (समाजसेवा) ४) अनिरुद्ध वनकर (कला)
  • राष्ट्रवादी काँग्रेस
    १) एकनाथ खडसे (सहकार आणि समाजसेवा) २) राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा) ३) यशपाल भिंगे (साहित्य) ४) आनंद शिंदे (कला) (Can Governor reject list of Governor Elected Vidhan Parishad MLC given my CM and Ministry)
  • शिवसेना१) उर्मिला मातोंडकर (कला) २) नितीन बानगुडे पाटील ३) विजय करंजकर ४) चंद्रकांत रघुवंशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER