नियुक्त आमदार : महाविकास आघाडीने राज्यपालांना दिली १२ नावांची यादी

Governor

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांसाठी नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे देण्यात आली.

आज संध्याकाळी ६ च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली व आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली

यादीतील नावे

काँग्रेस

 1. सचिन सावंत (सहकार आणि समाजसेवा),
 2. रजनी पाटील (सहकार आणि समाजसेवा),
 3. मुजफ्फर हुसैन (समाजसेवा),
 4. अनिरुद्ध वणगे (कला)

राष्ट्रवादी काँग्रेस

 1. एकनाथ खडसे
 2. राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा),
 3. यशपाल भिंगे (साहित्य),
 4. आनंद शिंदे (कला)

शिवसेना

 1. उर्मिला मातोंडकर (कला),
 2. नितीन बानगुडे पाटील
 3. विजय करंजकर
 4. चंद्रकांत रघुवंशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER