बारावी परीक्षेचे उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात

बारावी परीक्षेचे उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) 2021 घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास उदया 15 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येत आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. मात्र परीक्षा कधी होणार, शैक्षणिक वर्षाबाबतच्या नियोजनबाबत अद्याप स्पष्टता नाही.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020 परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 घेण्यात येणाऱ्या बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून 15 डिसेंबर 2020 पासून 4 जानेवारी 2021 पर्यंत भरायचे आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगीनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री- लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे. बारावी परीक्षेची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER