कर्जमुक्ती योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १८३०७ लाभार्थ्यांचे अर्ज

रत्नागिरी /प्रतिनिधी :-  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १८,६२८ पात्र शेतकऱ्यांपैकी १८,३०७ शेतकऱ्यांनी आत्तापर्यत अर्ज अपलोड केले आहेत. उर्वरित ३२१ शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड करण्याचे काम सुरू आहे. या सर्व शेतकऱ्यांची कर्जापोटीची मिळून ८० कोटी ५७ लाख ९८ हजार इतकी रक्कम कर्जमाफीस पात्र होणार आहे . राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी शासनाकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जाची परतफेड मुदतीत झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेण्यास पात्र करणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाकडून या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे.

फडणवीस यांनी वाटलेल्या क्लीन चिट उद्धव फाडणार

१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या पोर्टलवर शासनाचे पोर्टल पात्र शेतकऱ्यांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. १८ फेब्रुवारीअखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११८०९ खातेदारांचे अर्ज अपलोड करण्यात आले असून २८२ अर्ज शिल्लक आहेत. तर राष्ट्रीय बँकांचे ६४९८ अर्ज अपलोड झाले असून ३९ अर्ज अपलोड करणे बाकी आहे. आत्तापर्यंत एकूण १८३०९ अर्ज पोर्टलवर यशस्वीरित्या सबमिट झाले असून या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ८० कोटी ५७ लाख ९८ हजार एवढी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. या बँकेच्या ११८०९ खातेदारांची एकूण ३० कोटी ७८ लाख ९८ हजार एवढी कर्जमाफीची रक्कम असून राष्ट्रीय बँकांच्या ६४९८ खातेदारांची ४९ कोटी ७९ लाख अशी मिळून एकूण ८० कोटी ५७ लाख ९८ हजार रूपये १८ हजार ३०७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा होणार आहेत.