अदृश्य कोरोना शत्रूला हरवण्यासाठी माजी सैनिकांना आवाहन

कोल्हापूर :- कोरोना या अदृश्य शत्रूला पराभूत करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सेवेची गरज आहे. आपल्या क्षमतेनुसार आपण सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील माजी सैनिकांना करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक संजय शिंदे यांनी माजी सैनिकांसाठी एक संदेश पाठवला आहे. आदरणीय माजी सैनिक हो, सीमेवर, संरक्षण दलात आपण देश रक्षणासाठी सेवा दिलेली आहे, कोरोना या न दिसणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यासाठी व मातृभूमीला सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सेवेची आवश्यकता आहे. तरी आपण सर्वांनी कोरोना या शत्रूशी चालू असलेल्या लढाईत आपल्या क्षमतेनुसार सहभागी व्हावे. सोबत पाठविलेल्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdPhhl8CrRqbWp0dT-KObPn9lreH8txJMM-EEGcaYFOAeAV9g/viewform या गुगल फॉर्म लिंकवरील माहिती भरून आपला सहभाग नोंदवावा. मेजर सुभाष सासणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर (मोबाईल क्र. 9970856438), कॅप्टन उत्तम पाटील ( मोबाईल क्र 9420603031), मारुत्ती सावर्डेकर, वरिष्ठ लिपिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर (मोबाईल क्र. 9403604568) या संपर्क क्रमांकावर आवश्यकतेनुसार संपर्क करण्याबाबतही कळविण्यात आले आहे. जिल्ह्यांतील ६२ आजी-माजी सैनिक संघटना आहेत. यामध्ये ३४२७ माजी सैनिकांचा समावेश असून त्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्त झालेले ४९ जण आहेत. प्रत्येक तालुक्यातील जवानांनी या लिंकवर आपली नोंदणी करावी. आपापल्या तालुक्यातील तहसीलदारांना संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Web Title : Appeal to ex-servicemen to defeat the invisible Corona enemy

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)