केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र

Apoorva Chandra

नवी दिल्ली : भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र (Apoorva Chandra) यांनी आज कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव पदाचा पदभार स्वीकारला.

श्री.चंद्र हे महाराष्ट्र कॅडरच्या 1988 तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्येही श्री.चंद्र प्रतिनियुक्तीवर होते. 2013-17 या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांनी बजावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER