परत अशी चूक होणार नाही, मराठी लोकांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा

जान कुमार सानू

मुंबई : टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ (Big Boss 14) च्या पर्वातील एका भागात शोचे स्पर्धक आणि गायक जान कुमार सानू याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक स्तरावरून संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.

यावेळी जान कुमार सानू म्हणाला की, मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं त्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER