मुंबई कृउबासच्या गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Drone camera -Market

मुंबई : कोरोनात लोकांचा संपर्क टाळण्यासाठी लॉकडाऊन करून सामाजिक दूरत्वावर भर देण्यात येतो आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी होत असल्याने काही दिवस बाजार बंद ठेवण्यात आला होता. आज बाजार पुन्हा सुरू करण्यात आला मात्र, गर्दीवर ड्रोन  कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येणार आहे.

‘आरोग्य सेतू अँप’ गुगलवर नंबर वन

बाजार समितीमधील ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जाते की नाही, यावर ड्रोनने पोलिसांची नजर असणार आहे. नियमाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच बाजारासाठी काही नवे नियमही करण्यात आले आहे. त्या नियमानुसार काम होईल. ज्याला माल मागवायचा असेल तर त्यांनी बाजार समितीच्या भाजीपाला विभागाच्या कार्यालयात येणाऱ्या मालाची माहिती आदल्या दिवशी लेटरपॅडवर गाडी क्रमांकसह द्यावी. जे व्यापारी ही माहिती बाजार समितीला देतील त्यांनाच बाजार समितीत प्रवेश मिळेल. मालाच्या गाड्यांच्या विचार करून मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

भाजीपाला, कांदा-बटाटा आणि धान्य मार्केट आज सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी मार्केटमध्ये १८० गाड्यांची आवक झाली होती.