APMC मार्केट : नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री!

APMC Market - No Entry Without Antigen Test Report

नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत (APMC Market) अँटीजेन टेस्ट (Antigen Test) केल्याशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. एपीएमसी मार्केटचे संचालक, सचिव आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. तर यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नागरिक या मार्केटमध्ये मनमानी गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच काही व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक मास्क वापरत नसल्याचे समोर आले होते.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाच्यावतीने नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री सुरू करण्यात आली आहे. एपीएमसी प्रशासनाच्यावतीने सॅनिटायजिंग करणे, मास्क वापरणे बंधनकारक आणि सामाजिक अंतर पाळणे यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तर बाजार आवाराशी संबंधित सर्व घटकांना ७ एप्रिलपर्यंत अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे.

बाजार समितीतील संबंधित घटकांनी अँटीजेन टेस्ट केली नसल्यास त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तर मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम ३०० ऐवजी ५०० करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न करत असून केलेल्या उपाययोजनांमुळे मदत होईल. तर बाजार आवारातील सर्व घटकांनी एपीएमसी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती अशोक डक यांनी केले.

अडीच महिन्यांत १८ हजार जणांवर कारवाई
नवी मुंबईत शासन आणि महापालिका प्रशासन यांनी जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत त्यावर पोलीस प्रशासनाकडून लोकांचे प्रबोधन करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. अडीच महिन्यांत नियम मोडणाऱ्या १८ हजार जणांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या मार्गदर्शक नियमांचे पालन झाल्यास कोरोना संख्या आटोक्यात राहील. एपीएमसी मार्केट प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात आली आहे. २० ते २५ कर्मचाऱ्यांचे पथक मार्केटमध्ये कार्यरत केले आहे. तर रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास एपीएमसी प्रशासन, महापालिका आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा करून आणखी कडक निर्बंध वाढवण्याबाबत विचार केला जाईल, असे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button