अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त; नवी मुंबईच्या मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा संप

AMPC Market

मुंबई : अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी नवी मुंबईतील माथाडी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा,फळ,भाजीपाला, धान्य व मसाला मार्केटमध्ये हजारो संख्येने माथाडी कामगार काम करतात. त्यामुळे एपीएमसी बाजारपेठेतील इतर व्यवहारही ठप्प होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमध्ये आलेल्या 120 गाड्या तशाच उभ्या आहेत. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. राज्य सरकारने महामंडळ बरखास्त केल्याने त्यांचे अध्यक्षपद गेले. त्यामुळे माथाडी कामगार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER