सिडनी क्रिकेट मैदानावर विजय मिळवण्याशिवाय विराट कोहलीचे असेल आणखी एक आव्हान

India vs Australia 2020 - 2nd ODI - Sydney Cricket Ground

विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंतच्या वन डे कारकीर्दीत ५९.१४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, परंतु सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) वनडे क्रिकेटमधील त्याची सरासरी कमी राहिली आहे.

सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या वनडेत पराभवानंतर एकीकडे टीम इंडिया २९ नोव्हेंबरला या मैदानावर होणाऱ्या दुसर्‍या सामन्यात मालिकेत बरोबरीत साधरायला उतरेल, तर कर्णधार विराट कोहलीसमोर या मैदानावर त्याचे वैयक्तिक विक्रम सुधारण्याचे आव्हान असेल.

विराट कोहलीने आतापर्यंतच्या वन डे कारकीर्दीत ५९.१४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, परंतु सिडनी क्रिकेट मैदानावर वनडे क्रिकेटमधील त्याची सरासरी कमी राहिली आहे. या मैदानावर त्याने केवळ ११.४० च्या सरासरीने ६ वनडे सामन्यात ५७ धावा केल्या आहेत. त्याच मैदानावर त्याचा स्ट्राइक रेटही ६४.०४ चा आहे, तर आपल्या कारकीर्दीत त्याने आतापर्यंत ९३.२६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

कोहलीचा मर्यादित षटकांचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने शुक्रवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात SCG मैदानावर ६६ चेंडूत १०५ धावांचा शतकीय डाव खेळला. भारतीय कर्णधार मर्यादित षटकांनंतर पहिल्या कसोटी सामन्यातच भारतीय संघाचे नेतृत्व करेल आणि त्यानंतर तो आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे मायदेशी परत येईल. तो कसोटी मालिकेतील शेवटचे ३ सामने खेळणार नाही आणि यापैकी एक सामना सिडनी येथे खेळला जाणार आहे.

कसोटीत सिडनीमध्ये कोहलीची चांगली सरासरी आहे. SCG मैदानावर त्याने पाच डावांमध्ये ४९.६० च्या सरासरीने धावा केल्या आहेत, जे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ५३.६२ च्या सरासरीपेक्षा थोडेच कमी आहे. टी -२० मध्ये कोहलीने सिडनी क्रिकेट मैदानावर आत्तापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत, जेथे त्याची सरासरी १११ आहे आणि त्याने दोन्ही डावांमध्ये अर्धशतक ठोकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER