राज ठाकरे यांच्यासोबतच विविध संघटनांनी भाजप विरोधी भूमिका केली जाहीर

raj -BJP

प्रतिनिधी, ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचार करण्याची भुमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केली असतानाच त्यापाठोपाठ आता स्वराज्य इंडीया, आप, स्वाभिमानी रिपब्लिनक पक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कामगार कृती समितीसह विविध संघटनांनेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपाविरोधात मतदान करणार असल्याची भुमिका जाहीर केली. तसेच या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना टक्कर देऊ शकेल अशा उमेदवारांना पाठींबा देणार असल्याचे सांगत त्यांनी ठाण्यात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पाठींबा जाहीर केला आहे.

ही बातमी पण वाचा : वाढलेले मतदान कुणाला बुडवणार?

ठाण्यातील विविध पक्ष आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत भुमिका स्पष्ट केली. या परिषदेला ज्येष्ठ कामगार नेते विश्वाास उटगी, अ‍ॅड. एम ए पाटील, स्वराज इंडियाचे संजीव साने, अंनिसच्या वंदना शिंदे, ठाणे मतदाता जागरणच्या डॉ चेतना दिक्षित, आम आदमी पार्टीचे सुभाष तंवर व राकेश आंबेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अच्छे दिन, विकास, काळा पैसा, स्वच्छ भारत अशा काल्पनिक वलग्ना मोदी सरकारने पाच वर्षांपुर्वी केल्या होत्या. त्यामुळे मोठ्या आशेने जनतेने मोदी सरकारला मोठ्या मताधिक्याने निवडूण दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात सरकारचे काम पहाता जनतेच्या पदरी निराशा पडली आहे. तसेच देशात विकास झाला नसून देश भकास झाला आहे, अशी टिका पक्ष आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी केली. देश आणि संविधान वाचविण्यासाठी शिवसेना-भाजपच्या विरोधात मतदान करण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पक्षाच्या उमेदवारांना हरविण्याची क्षमता असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचा संकल्प केला असून यातूनच राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठींबा देत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

हि बातमी पण वाचा : …आणि राज ठाकरेंना उर्दू वर्तमान पत्रात मिळाले महत्वाचे स्थान!