हिंदुत्वासाठी काहीपण… राज ठाकरेंचे कट्टर हिंदुत्व सिद्ध करणारा व्हिडीओ

Raj Thackeray - Video

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जानेवारी महिन्यात कट्टर हिंदुत्वाची कास धरली. त्यानंतर राज ठाकरेंमध्ये हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद होत चालल्याची दिसून येत आहे. राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका सर्वश्रुत आहे. पण या वर्षी जानेवारीत त्यांच्या पक्षाने भगवा झेंडा हाती घेतल्याने राज यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. राज यांची हिंदुत्ववादी भूमिका अधिक ठळक करणारा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ आता ‘न्यूज-१८ लोकमत’ ने प्रसारित केला आहे.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसेनेच्या (Shiv Sena) काही कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शांती पाठाचं पठण केलं. त्यामुळे राज यांची हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER