मुसळधार पावसाच्या इशाऱ्याने पाटणात काळजी

पाटणा : गेल्या काही दिवसात पावसाने उसंत दिल्याने पाटणामध्ये तुंबलेले पुराचे पाणी उतरत असताना हवामान खात्याने आज पुन्हा मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. यामुळे पाटणा प्रशासन काळजीत पडले आहे.

बिहारमध्ये २७ ते ३० सप्टेंबर मुसळधार पाऊस झाला. पाटणासह १५ जिल्ह्यात पुराचे पाणी जमले आहे. पाटणाची स्थिती अजूनही अतिशय गंभीर आहे. पाऊस थांबल्यानंतर मोठमोठया पंपाने पाणी उपसणे सुरू आहे. यासाठी कोळसाखाणींमधले पाणी उपसण्याचे प्रचंड क्षमतेचे पंप वापरले जात आहेत. अनेक दिवसांपासून तुंबलेल्या पाण्यात मेलेले प्राणी सडले. त्यामुळे रोगराई पसरण्याच्या धोका निर्माण झाला आहे. लोकं शहर सोडून जात आहेत.
जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचावकार्य करत आहेत.