कोविडदरम्यान वाढली मुलं व कुमारवयीन मुलांमधील एंग्जायटी!

Coronavirus

सध्या कोरोना (Corona) विषाणूने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे. सर्वत्र भीती, अस्वस्थता, अनिश्चितता आणि त्यातून येणारी चिंता सगळ्यांनाच भेडसावते आहे. याला बालके व कुमार वयातील मुले यांचाही अपवाद नाही. मुलांना तो कसला ताण अन् कसली चिंता! असं म्हणायचा काळ तर आता संपलाच आहे. त्यात येणारी ही नवीन संकट ज्यामुळे जीवनाच्या सर्वच घटकांवर परिणाम होतोय. त्यामुळे ताण सहन करण्याची शक्ती संपते व त्याची जागा चिंता व चिंतेसारखे आजार घेतात.

एका अठरा वर्षाच्या मुलीच्या घरात कुठल्याही मानसिक आजाराची हिस्ट्री नव्हती. लोक डाऊन चा पहिला टप्पा सुरू झाला त्या दरम्यान ती दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्ही व इतर मीडिया वर केवळ वेगवेगळ्या देशात होणारी कोरोनाची लागण, रुग्णांची वाढती आकडेवारी, मृत्यू, मिळणाऱ्या सोयींची कमतरता, लॉकडाऊन (Lockdown) तोडून सर्वत्र होणारी गर्दी व व त्यामुळे होणारा प्रसार हेच बघायची. आई-वडील अत्यावश्यक सेवेत असणारे. याचा व्हायचा तो परिणाम झाला. ‘ या पृथ्वीवरील प्रत्येकाला कोरोना होणार आणि सगळेच मरणार ‘, असा तिचा समज पक्का झाला. वारंवार छातीत धडधडणे, तोंडाला कोरड पडणे, जीव घाबरणे, नोशिया, जेवण्याच्या सवयीत बदल, झोप न लागणे, तीव्र डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, श्वासाचा त्रास, छातीत दुखणे, हाता पायाला मुंग्या येणे ही लक्षणे दिसू लागली. तिने टीव्ही पाहणं बंद केलं तरी ही लक्षणे दिवसातून तीन-चार वेळा केवळ एखादी बातमी ऐकूनही जाणवायची.

ही बातमी पण वाचा : गोष्ट एका ‘ती’ची

बारावीची परीक्षा झालेला प्रभास. बारावीनंतरच्या प्रवेशासाठी असणाऱ्या सगळ्या परीक्षा केव्हा होणार यातील अनिश्चितता.. सुरुवातीला अभ्यास केला. आता आईबाप आणि प्रभास दोघही कंटाळले. तो १२-१२ तास सतत मोबाईलवर गेम्स खेळू लागला. त्याची चिडचिड व आक्रमकपणा वाढला. एकदा आईने परीक्षेची आठवण करून दिली तर अंगावर धावून आला, आणि नंतर घराबाहेर पडला, चार-पाच तासांनंतर घरी आला. तोपर्यंत आईचा जीव थाऱ्यावर नव्हता.

एकूणच सध्या शाळा महाविद्यालय कधी उघडणार? रिझल्ट कधी लागणार? प्रवेश परीक्षा कधी होणार? प्रवेश प्रक्रिया कशी असेल? असे सगळे प्रश्नच विद्यार्थ्यांपुढे आहेत. त्यामुळे रोजचे रुटीन पार बिघडलेला आहे. २४/७ ते आई वडिलांसमोर आहे. त्यामुळे हे त्यांना ‘इरिटेट ‘करणारे आहे. हे कर, ते नको करू, असं कर, तसं कर, काय करतो आहे?

ही बातमी पण वाचा : ” शुभ बोल रे नाऱ्या ! ” 

काहीजणांना आई-वडील ड्युटी मुळे पूर्णवेळ बाहेर असल्याने एकाकीपणा व ‘ तिसरा पालक ‘ असणारा मीडियाचा आधार. अशावेळी पालकांपासून जाणवणारी ही ताटातूट त्रासदायक आहे.

अनेक लोकांच्या या दरम्यान रोजीरोटीवर गदा आलेली आहे. काहींच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगारीला तोंड देतात आहे. आर्थिक तूट इथून निर्माण होणारा ताण, त्यातून कुटुंबात होणारे संघर्ष. किंवा गृहिणींवरील वाढलेला कामाचा बोजा. सतत चोवीस तास एकत्र घालवल्याने नवरा बायको व इतर घरातील लोकांना एकमेकांचे जे दोष वाटतात ते जास्तच रुतायला लागलेले आहेत. घटस्फोटाचे प्रमाणही काही प्रमाणात वाढलेले आहे. काही लोकांनी या दरम्यान शहराकडून खेड्याकडे व आपल्या आपल्या गावी असा प्रवास केला. त्यामुळे मुलांचे आजूबाजूचे वातावरण, माणसं, मित्रपरिवार सगळच बदललं. त्याचाही ताण मुलांना आलेला आहेच.

ही बातमी पण वाचा : ये दिल मांगे मोअर !

विशिष्ट वयात मुलांना आईवडिलांपेक्षा बरोबरीच्या मित्रांची ओढ असते, त्यांच्या सगळ्या गोष्टी पटतही असतात. आज मुले या सहवासाला मूकतात आहे. सोशल मीडियाची ही सोबत आणखीच त्रासदायक. यादरम्यान मुलांच्या अयोग्य लोकांशी, त्रासदायक ओळखी होऊ शकतात, पॉर्नोग्राफी बघून चुकीचे मार्ग अवलंबू शकतात.या सगळ्यावर ‘सशक्त निकोप पालकत्व’ (हेल्दी पॅरेंटिंग) हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे.

मुळात आपला ताण, आपली निराशा ह्याच्याशी सर्वात प्रथम, योग्य समायोजन करण्याची क्षमता पालकांमध्ये असेल तर ती मुलांपर्यंत योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने ते पोहोचवु शकतात. मुलांचा स्क्रीन टाईम लिमिटेड ठेवून पालकांनी स्वतः ‘क्वालिटी टाइम ‘ त्यांना देता येईल हे बघायला हवं. त्यांच्यात अचानक होणारे बदल, अचानक चिडणे, रडणे, कुणाशी न बोलणे असे दिसताच त्यांच्याशी योग्य संवाद साधावा. त्यावेळी अशा वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्यावा, मेंटल सपोर्ट द्यावा.

ही बातमी पण वाचा : करोनाचा थेट नसलेला बळी आणि काही प्रश्न  

आपली भारतीय कुटुंब व्यवस्था हा आपली एक जमेची बाजू (असेट) आहे. यात कुठलाही इगो आड येऊ न देता मदत द्यावी आणि घ्यावी. घरातील बाबा मंडळींनी सुद्धा मुलांना सोबत घेऊन दररोजच्या कामातल्या जबाबदाऱ्या उचलाव्यात. कामाची कामाची विभागणी हे देखील एक जीवन कौशल्य मुलांना शिकवता येईल. कुटुंबात चार डोकी एकत्र आली की भांड्याला भांडे लागणारच. तसे समजूतदारपणे लगेच थांबवावे. कुटुंबातील नवरा-बायको यांचे सगळ्यात मुद्द्यांवर पटेलच असे नाही. दोघांनीही थोडं सोडून दिल्यास व प्रत्येकाला आपापली स्पेस दिल्यास संघर्ष टळतील. तरी संघर्ष होणारच असतील तर ते मुलांच्या देखत करू नयेत कारण मुले याने असुरक्षितता अनुभवतात. संघर्ष जा मुद्द्यावर सुरू झाले त्याच मुद्द्यावर संपवावे आणि आणि ठराविक वेळात.

आई-वडिलांचा घटस्फोट हा मुलांवर होणारा सगळ्यात मोठा आघात आहे. अशावेळी या परिस्थितीत मुले जबाबदार नाहीत याची जाणीव त्यांना करून द्यावी. आई-वडील आपल्याला भेटतील की नाही, आपली शाळा, मित्र याबाबतचे असंख्य प्रश्न त्यांना पडतात. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे.

या काळात फिजिकल ॲक्टिविटी, एक्सरसाइज, वॉकिंग या साऱ्यावर घरातल्या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केलेत तर खूप मजा येते. वेळही छान जातो. त्यामुळे निराशा, चिंता निश्चितपणे दूर राहते. हाच काळ हा मुलांचा पुस्तकांपलीकडे बघण्याचा, शिकण्याचा, अनुभवण्याचा आहे. लाइफ स्किल्स शिकण्याचा प्रोग्रॅम म्हणजे हा क्वारंटाईन पिरिएड होऊ शकतो. अशा घरातल्या वातावरणाने मुलांची मानसिकता सकारात्मक राहून ते रिलॅक्स होऊ शकतील. म्हणूनच शक्य होईल तेव्हढे घरात रहा!

‘स्टे होम! स्टे पॉझिटिव्ह!! स्टे हेल्दी!!!’

मानसी फडके
एम. ए मानसशास्त्र,
एम.एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER