अन्विताने जिंकले चॅलेंज

Anvita Phaltankar

एकमेकांच्या खबरबात एकमेकांना सांगण्याचं प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाने चांगलीच बाजी मारली आहे. अर्थात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या पेजवर सतत काही ना काही तरी धमालमस्ती सुरु असते. यामध्ये सेलिब्रिटी कलाकारही मागे नाहीत. सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद देणारे वेगवेगळे चॅलेंजेससेलिब्रिटी कलाकार स्वीकारत असतात आणि त्या छोट्या चॅलेंजच्या निमित्ताने धमाल करत असतात. येऊ कशी तशी मी नांदायला या टीव्ही मालिकेमुळे सध्या काही दिवसातच लोकप्रिय झालेली अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिला तिच्या मैत्रिणीनी एक असे चॅलेंज दिले की ज्यामुळे तिला दिवसभर फक्त पिवळ्या रंगाचेच पदार्थ खावे लागले .अर्थात प्रचंड फूडी असलेल्या अन्वितासाठी हे चॅलेंज म्हणजे तिच्या आवडीचं होतं. त्यामुळे दिवसभर ती पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा फक्त विचारच करत नव्हती तर स्वतःच्या हाताने बनवून तिने या पदार्थांवर ताव मारला.

नायिकांनी स्लीम ट्रीमच असलं पाहिजे हा समज पुरता खोडून काढत अन्विता फलटणकर हिने अभिनयाच्या जोरावर असंख्य चाहते कमावले आहेत. गर्ल्स, टाइमपास या सिनेमात शारीरिक वजनाला गोली मारो अस म्हणत तीने धम्माल केली आहे. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेमालिकेतून शारीरिक वजनाने जाड असलेल्या मुलींचे प्रतिनिधीत्व करत आहे.

अन्विताच्या मैत्रिणींनी तिला कलर चॅलेंज दिलं ते तिने स्वीकारलं आणि तिचा 24 तास फक्त पिवळ्या रंगाचे पदार्थ खाण्याचा टास्क सुरू झाला. अर्थात तिने हे सगळं मजा-मस्तीने घेतलं. आता चखाण्याचे चॅलेंज म्हटलं की तिथे थोडेफार उन्नीस-बीस होऊ शक त म्हणूनच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी शर्वरी नावाची मैत्रीण खास तिच्यावर एक दिवसासाठी सीसीटीव्ही कॅमेराप्रमाणे तिच्या घरी तळ ठोकून होती.

सुरुवातीला अन्वितासमोर काही चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या ज्यामधून तिला एक चिठ्ठी उचलायची होती. चिठ्ठीमध्ये ज्या रंगाचे नाव असेल त्याच रंगाचे पदार्थ तिला दिवसभर स्वतःच्या हाताने करून खायचे होते. त्यामुळे या चॅलेंजला अजूनच मजा आली. अन्विताने सुरुवात केली ती आम्लेटपासून. फक्त पिवळा बलक आणि कांदा एवढच वापरून तिने या चॅलेंजमधला पहिला पदार्थ केला . आता पुढे जेवणात काय खायचं असा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला तेव्हा तिच्या आईने काही पिवळ्या रंगाचे पोटभरू पदार्थ सुचवले. यातून अन्विताने मुगाच्या खिचडीचा पर्याय निवडला होता पण घरात मुगाची डाळ संपली असल्याने तिला कांदेभात करून खावा लागला ज्यामध्ये हळद घातल्यामुळे त्याचा रंग छान पिवळ्याधमक झाला होता. संध्याकाळच्या स्नॅकसाठी आणि छोटीशी पोटपूजा करण्यासाठीच्या पदार्थाच्या साहित्य खरेदीला अन्विता बाजारात गेली अर्थातच तिच्याबरोबर शर्वरी होती. बाजारातून तिने स्वीटकॉर्न आणि अमूल बटर अशी खरेदी करत केली आणि त्यानंतर तिने संध्याकाळच्या पोटपूजेसाठी कॉर्नभेल बनवली. रात्रीच्या जेवणासाठी मात्र तिने मुगाच्या खिचडीला पसंती दिली. जेव्हा हे चॅलेंज संपलं तेव्हा हुश्श असं म्हणत तिने चॅलेंज जिंकल्याचा आनंद देखील व्यक्त केला.

अन्विता सांगते, केवळ विचार केला तर आपल्याला खूप पिवळ्या रंगाचे किंवा एकाच रंगाचे पदार्थ खायला मिळणार असं वाटतं. पण जेव्हा खरंच हे चॅलेंज मी स्वीकारलं तेव्हा आणि जेव्हा मला पिवळा रंग आला तेव्हा माझ्यासमोर असा प्रश्न पडला होता की पिवळ्या रंगाचे कुठले पदार्थ मी घरी करू शकते आणि त्यातून मला खूप वेगवेगळे पदार्थ खूप खूप वेगवेगळे पदार्थ बनवता आले. चॅलेंज मुळे खूप मजा आली.

या चॅलेंज दरम्यान अन्विताने सकाळपासून रात्रीपर्यंत केलेल्या पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा व्हिडिओ सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. ते सगळे पदार्थ तिने स्वतःच्या हाताने केल्यामुळेदेखील तिच्या चाहत्यांनी तिच्या पाककौशल्याला दाद दिली आहे.

अन्विताने बाल कलाकार म्हणूनच तिच्या अभिनयाला सुरुवात केली. ती लहानपणापासूनच गोलमटोल असल्यामुळे अनेक विनोदी भूमिका देखील तिने बालनाट्यमध्ये केलेल्या आहेत. टाईमपास या सिनेमातील तिची भूमिकादेखील खूप गाजली होती. ती काही वेब सिरीजमध्ये दिसली आहे. सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अन्विता साकारत असलेली स्वीटू म्हणजेच अवनी साळवी ही भूमिका लोकप्रिय झाली आहे. प्रत्यक्ष जीवनातही अन्विताला खायला खूप आवडतं. आणि जेव्हा तिला खाण्याच्या गोष्टीचेच चॅलेंज दिलं गेलं तेव्हा तो टास्क तिने पूर्ण केला नसता तरच नवल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER