अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार, पत्नी अक्षता नाईक यांचा आरोप

Arnab-Goswami

मुंबई : २०१८ साली अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईकने (anvay-naik) आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पोलिसांचे आभार मानले. ‘२०१८ हे वर्ष आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज महाराष्ट्र पोलिआंनी जो दिवस आणलाय त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. सुसाईड नोट मध्ये नाव असून कारवाई त्यावेळी करण्यात आली नाही. पण आज ती केली आहे म्हणून पोलिसांचे आभार मानते’, या शब्दात अक्षता नाईक (Akshata-naik) यांनी आभार मानले आहेत.

अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग न्यायालयात आज अर्णब गोस्वामीला हजर करण्यात येणार आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी रिपल्बिक चॅनलचे इंटिरिअरचे काम केले होते. त्यावेळी कामाचे पैसे न दिल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीच्या नावाचा उल्लेख केला होता. या संदर्भात आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.

सुसाईड नोटमध्ये फिरोज शेख, अर्णव गोस्वामी यांचं नाव होतं. तरीही त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अर्णव गोस्वामी यांनी मुद्दाम रक्कम परत दिली नाही, असा आरोप अक्षता नाईक यांनी केला आहे. कोव्हिड व्हायरस नाही तर अर्णव गोस्वामी नावाचा हा व्हायरस आहे. पैसे देणारच नाही कसे मिळतील बघतोच अशी धमकी देखील अर्णब गोस्वामीने दिली. त्यांना वेळेवर पैसे दिले असते तर माझ्या पतीने आत्महत्या केली नसती. त्यांच्या मृत्यूला अर्णब जबाबदार आहे .अर्णव गोस्वामीचं स्टेटमेंट तेव्हा रेकॉर्ड झालं होतं. सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये रेकॉर्ड झालेलं इतकं प्राधान्य अर्णब गोस्वामीला का? असा सवाल देखील करण्यात आला आहे.

इंटिरिअरच्या कामाचे एकूण ८३ लाख रक्कम नाईक कुटुंबियांना येणं आहे. याबाबत महाराष्ट्र पोलिसांना चौकशीची विनंती करण्यात आली आहे. तसेच त्यावेळेचे तपास अधिकारी वराडे यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली आहे. भारतातील लोकांनी सत्याचे समर्थन केले पाहिजे, यात राजकीय हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आमचं प्रकरणं भटकवण्याचा प्रयत्न झाला आहे, मोदींनाही पत्र लिहिलं होत. सुशांतसिंहबाबत एवढं सांगत होतो, त्यावेळी माझ्या पतीने त्याचं नाव सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलं आहे, तरीही कारवाई झाली नाही. अर्णवला अटक झाली हे खूप चांगलं झालं, त्या तिघांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, मला माहिती नाही. असेही अक्षता नाईक यावेळी म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER