अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आधीच्या सरकारने दाबले; जयंत पाटलांचा आरोप

Anvay Naik - Jayant Patil

सिंधुदुर्ग : अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्याप्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करण्यात आली आहे. त्यात, राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही, असे सांगताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आरोप केला की,

पूर्वीच्या सरकारने हे प्रकरण दाबले होते. (Jayant Patil Slams Bjp Over Anvay Naik Suicide Case)

कोकण दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्णव गोस्वामी यांना पत्रकारीतेप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये अर्णव यांचे नाव आहे. त्यांचे एकट्याचेच नव्हे तर आणखी दोघांची नाव त्यात असून त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली.

नाईक कुटुंबांनी कोर्टाला विनंती केल्यानंतर कोर्टाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. पूर्वीच्या सरकराने हे प्रकरण दाबले होते. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो. मात्र, पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला. आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली, असे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER