अनुष्काने काय दिलेय गावसकरांना उत्तर?

Anushka Sharma-Gavaskar.jpg

आपण २०२० मध्ये आहोत आणि अजूनही काहीच बदललेले नाही, अशा शब्दांत अभिनेत्री व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना उत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा:- गावसकर नेमके काय म्हणाले आणि काय होतेय टीका? 

गावसकर यांनी आक्षेपार्ह शब्दांत केलेल्या टिप्पणीला अनुष्काने इन्स्टाग्राम (Instragram) पोस्टद्वारे उत्तर दिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, आपण २०२० मध्ये आहोत आणि काहीच बदललेले नाही. मिस्टर गावसकर, एकतर तुमचे विधान हे किळसवाणे आहे; परंतु पतीच्या खेळाबद्दल पत्नीसंदर्भात असे स्वैर विधान करावेसे तुम्हाला का वाटले याचा खुलासा तुम्ही केला तर मला तो आवडेल. मला खात्री आहे की, एवढी वर्षे कॉमेंट्री करताना तुम्ही इतर खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला असणार.

आमच्याबाबतही तुम्ही तोच सन्मान राखायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का? आपण २०२० मध्ये असल्याच्यासंदर्भाने तिने म्हटलेय की, मला क्रिकेटमध्ये ओढणे केव्हा थांबेल आणि कोणत्याही उलटसुलट विधानांमध्ये मला गोवणे कधी बंद होईल? अनुष्काने गावसकरांना असेही विचारलेय की, तुम्ही इतर किती तरी वेगळे शब्द वापरू शकत होतात. वेगळ्या प्रकारे याच अर्थाचे वाक्य बोलू शकले असता; पण माझे नाव जोडल्यानेच त्या शब्दांना अधिक समर्पकता येत होती का? आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही महान खेळाडूंच्या पंक्तीतले आहात. पण तुम्ही हे जे काही बोललात ते ऐकल्यावर मला काय वाटले हे तुम्हाला कळायला हवे म्हणून हे लिहिलेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER