‘आदिपुरुष’साठी अनुष्काचा नकार; सीता कोण बनेल हा सर्वांत मोठा प्रश्न

‘तानाजी’ चित्रपटानंतर ‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू केलेल्या दिग्दर्शक ओम राऊत (OM Raut) यांना मोठा धक्का बसला आहे. चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने भूमिका करण्यास नकार दिला आहे. हा दावा अनुष्काच्या जवळच्या स्रोतांचा आहे की याविषयी कोणीही तिच्याशी बोलले नाही. तथापि, या चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी अनुष्काचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते, अशी माहिती मिळाली आहे; पण आता
ती गरोदर (Pregnancy) असल्याने या प्रकल्पातून बाहेर पडली आहे.

अनुष्का शर्माने ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट साइन केल्याच्या बातम्या सतत चर्चेत आल्या आहेत; पण तिच्या निकटवर्ती सूत्रांचे म्हणणे आहे की, हे खरे नाही. या प्रोजेक्टमध्ये अनुष्काचे नाव कधीच आले नव्हते आणि याबद्दल कधी बोललेही नाही, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. ही माहिती अनुष्काच्या दृष्टिकोनातून योग्य आहे; पण आणखी एक पैलू पुढे आला आहे.

अनुष्का शर्माच्या नावाचा विचार चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारण्यासाठी केला होता. या संदर्भात अनुष्कासोबत काम करणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधींशीसुद्धा प्राथमिक चर्चा झाली. तथापि, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही; परंतु अनुष्का शर्माचे नाव ‘आदिपुरुष’ चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी निश्चितच प्रस्तावित करण्यात आले होते.

अनुष्काच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, ती पुन्हा बऱ्याच दिवसांपासून कॅमेर्‍यावर येण्यासाठी हताश झाली होती. ‘झिरो’ चित्रपटानंतर तिचा पुढच्या चित्रपट ठरला आहे; परंतु या दरम्यान विराट आणि अनुष्काने कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला.

आता येथे अडचण अशी आहे की प्रभास आणि त्याचे दिग्दर्शक ओम राऊत यांना लवकरात लवकर ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचे आहे. अनुष्काच्या योजनेनुसार ती एप्रिल २०२१ पूर्वी कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू नाही शकत. प्रकरण येथे येऊन अडकले आहे. तथापि, करीना कपूर खानने गर्भधारणेनंतरही काम सुरू ठेवले आहे आणि तिच्या पुढच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरणही केले आहे; पण अनुष्काला कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारायचा घ्यायचा नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER