बॉलिवूडमध्ये पुन्हा वंशवाद, आता इरफान खानच्या मुलाला दिली अनुष्का शर्माने संधी

Anushka sharma - Babil Khan - Maharastra Today
Anushka sharma - Babil Khan - Maharastra Today

बॉलवूडमध्ये बाहेरून येणाऱ्या तरण-तरुणींना लगेचच काम मिळणे खूप कठिण असते. पहिला ब्रेक मिळण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मात्र संघर्षानंतरही त्यांना संधी मिळेलच असे नाही. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलांना मात्र लगेचच संधी मिळते. बॉलिवूडमध्ये वंशवाद नाही असे म्हणणारेच अशा स्टार किड्सना संधी देताना दिसतात. यात करण जोहर आघाडीवर आहे. आणि आता अनुष्का शर्माही (Anushka Sharma) त्याच रांगेत बसण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वर्गिय अभिनेता इरफान खान (Irfan Khan) याच्या मुलाला बाबिलला (Babil) अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये तिच्या सिनेमातून एंट्री देणार आहे. बाबिलने त्याच्या पहिल्या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इरफान खान यांचे गेल्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर बाबिल सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होता. तो वडिलांचे आणि त्याचे फोटो पोस्ट करून वडिलांची आठवण काढत असे. जवळ जवळ रोज तो सोशल मिडियावर काही ना काही पोस्ट करीत असे. काही दिवसांपूर्वी एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये त्याने वडिल इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मिळालेला पुरस्कार घ्यायला गेला होता. हाच बाबिल आता ‘क्वाला’ (Qala) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. बाबिलने सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सिनेमाचा टीझर आणि त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला. या सिनेमाचे दिग्दर्शन अन्विता दत्तने केले असून यात बाबिलसोबत अनुष्का शर्माच्या बुलबुल सिनेमात काम केलेली तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जी दिसणार आहेत. बुलबुल सिनेमाचे दिग्दर्शनही अन्विता दत्तनेच केले होते. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. बाबिलचा हा सिनेमा नायिकाप्रधान असून आईच्या प्रेमासाठी आसुसलेल्या मुलीची कथा यात मांडण्यात आलेली आहे. हा सिनेमाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button